सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात आजही अनेक जण असे आहेत जे अरेंज्ड मॅरेजवर (Marathi Matrimony) विश्वास ठेवतात. खासकरून मुली ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य करियरला वाहीलेलं असतं, त्यांना अजिबात प्रेमात पडायला वगैरे वेळ मिळालेला नसतो किंवा आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न करायचं नसतं, त्या मुलींची अरेंज्ड मॅरेज करून छानसा जोडीदार निवडायची इच्छा असते. शेवटी लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय असतो. हा निर्णय चुकला तर सगळं आयुष्य उध्वस्त होऊ शकतो. म्हणूनच त्या आधी काही शहानिशा करून मग सारासार विचार करून निर्णय घेतलेला योग्य.

Love marriages are romantic and dreamy and you are filled with the excitement of marrying your soulmate. But there are times when people often opt for an arranged marriage instead of settling for a love marriage Marathi Matrimony :

Marathi-Matrimony-Arrange-Marriage

अरेंज मॅरेज ही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही , बालपणापासून आपण अरेंज मॅरेज बघत असतो. ज्यात दोन एकमेकांना पुर्णपणे अनोळखी असलेले लोक, एकमेकांसोबत आयुष्यभराच्या गाठी बांधतात. हे अरेंज मॅरेज तेव्हाच होतं जेव्हा मुलगा/ मुलगी स्वतःहून लग्न करण्यास असमर्थ असतात. अश्यावेळी त्यांचे पालक त्यांचासाठी सुयोग्य जोडीदार शोधतात. असा जोडीदार जो आयुष्यभराची साथ निभावणार आहे. ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे.

परंतु नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्याची काळजी लग्न करण्याआधी घेतली पाहिजे. तर आज आपण त्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या अरेंज मॅरेज करण्यापूर्वी डोक्यात ठेवल्या पाहिजे. जेणेकरून पुढील आयुष्य सुख आणि समाधानात जाईल.

१ ) एकमेकांना वेळ द्या:
बहुतांश विवाह हे मॅट्रीमोनिअल साईट्स, नातेवाईक यांचा भेटीतून जुळतात. जर तुम्ही एखादया मुलीला लग्नाची मागणी घातली आणि तिच्या घरच्यांनी होकार जरी कळवला. तरी तुम्ही तिला पुरेसा वेळ द्या. तिच्याशी बोला. बऱ्याचदा मुली घरच्यांचा दबावाखाली लग्न करतात. अश्यावेळी मुलीशी बोलत राहिलं पाहिजे. ती नात्यासाठी, पुढील वाटचाली योग्य आहे का हे ठरवलं पाहिजे. एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे मग काय तो निर्णय घेतला पाहिजे

२ ) त्याच्या / तिच्या घरच्यांसोबत वेळ घालवा:
भारतात असं म्हटलं जातं की लग्न हे केवळ दोन लोकांचं नसतं, तर ते दोन परिवारांचं असतं. त्यामुळे लग्नाच्या वेळी एकमेकांच्या परिवारासोबत वेळ घालवणे खूप महत्वाचे ठरते. यातून आपल्याला एकमेकांच्या परिवाराच्या स्वभावाची कल्पना येते,आवडी- निवडी समजतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आयुष्यभर या परिवारासोबत जुळवून घेऊ शकतो का याची कल्पना येते.

३ ) आर्थिक तडजोड:
पूर्वी लग्न झाल्यावर माणूस पैसे कमवायचा आणि स्त्री घरकाम करायची. आज देखील ती परिस्थिती बहुतांश असली तरी काळ बदलला आहे. स्त्री देखील स्वतःच्या पायावर उभी राहून नोकरी- व्यवसाय करू लागली आहे. सोबतच नवनवीन समस्या ही निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ महागाई, आज एका व्यक्तीच्या पगारात घर चालवणं शक्य नाही आणि कोणीच आकांशा व घेतलेल्या शिक्षणाला वाया जाऊ देत नाही.

स्त्री आणि पुरुष व्यवसाय आणि कमाईच्या बाबतीत स्वतंत्र असतात अश्यावेळी तुम्ही दोघांनी लग्नापूर्वीच आपल्या पगारातून कसे वाटे करायचे व पुढे कसे आर्थिक नियोजन करायचे यावर बसून चर्चा करणं गरजेचे आहे. असे केल्यास भविष्याची आखणी सोपी होते आणि पुढे जाऊन कोणा एकाच्या खांद्यावर जबाबदारी पडत नाही व वाद होत नाही त्यामुळे आर्थिक तडजोड आधी केलेली योग्य ठरते.

४ ) अस्तित्वात असलेल्या नात्याचं सत्य लपवू नका:
जर तुमची लग्न करण्याची तयारी नसेल. तुम्हाला आयुष्यात आजून काही मोठं करण्याचा मानस असेल अथवा कुठल्याही प्रकारच्या आकांक्षा असतील तर त्या तुमच्या जोडीदारासमोर दिलखुलासपणे मांडावयात. कुठलंही सत्य लपवू नका.

तुमचं आधीच कोणावर प्रेम असेल, तुम्ही लग्न करण्याचा मानसिकतेत नसाल तर ते दिलखुलासपणे मांडा, कुठलाही संकोच बाळगू नका कारण लपवल्याने गैरसमज पसरतात आणि या गैरसमजाचा अत्यंत वाईट परिणाम भविष्यात होत असतो.

५ ) आपला भूतकाळ लपवू नका:
कधीही आपल्या होणाऱ्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपवू नका, जेवढं जास्त तुम्ही दोघे एकमेकांशी राहाल तेवढा फायदा तुमच्या भविष्यात तुम्हाला होईल. तुम्ही तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात कोऱ्या पाटी प्रमाणे करू शकतात.

आयुष्यभर एकमेकांशी खरे राहू शकतात. तुमच्या भूतकाळातील चुका , प्रेम याबद्दल तुम्ही आधीच सांगितलं तर पुढे कुठलाच त्रास होणार नाही. जर भविष्यात भूतकाळ अचानक समोर आला तर खूप मनस्ताप सहन करावा लागू शकतो त्यामुळे आधीच मोकळंपणाने बोललेलं योग्य राहील.

जर नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी ह्या गोष्टी तुम्ही केल्या, तर तुमचं नात एकदम नव्या सारखं राहील आणि तुम्ही एकमेकांशी नवीन व अनोळखी असून सुद्धा आयुष्याची नवीन पाळी खेळू अत्यंत सुखासमाधानाने खेळू शकतात. कुठल्याही प्रकारचा मनस्ताप तुम्हाला भविष्यात सहन करावा लागणार नाही व आयुष्य प्रेमरंगाने रंगून जाईल.

Title: Marathi Matrimony things you should know before going for an arranged marriage.