भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले – मुली स्वतःच लग्न (Marathi Matrimony) ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

Marathi-Matrimony-precautions-before-fixing-marriage-1

लग्न म्हटलं की मुलाकडून मुलीची आणि मुलींकडून मुलाची चौकशी होते आणि ती झालीच पाहिजे. कारण आपण ज्या घरासोबत नातं जोडतोय आणि आपल्या मुलासाठी व मुलीसाठी ज्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करतो आहे ती नेमकी कशी आहे याबद्दल इत्यंभूत माहिती असणे गरजेचे असते. लग्नाआधी बऱ्याच गोष्टी समजल्या तर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलापेक्षा मुलीचीच जास्त चौकशी होते.

अर्थात आताच्या आधुनिक युगामध्ये हि गोष्ट बऱ्यापैकी बदलली असली तरी आजही अनेक समाजात लग्न ठरवताना मुलींवर प्रश्नांचा भडीमार केला जातो. मुलीला नीट ओळखून घेण्यासाठी काही प्रश्न विचारणे यात वावगं काही नाही पण काही प्रश्न असतात जे मुलीला विचारणे गरजेचे नसते पण तरी ते विचारले जातात.

Marathi Matrimony article about precautions need to take before fixing marriage in Indian wedding culture :

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फसवणूक होते. जोडीदार मानसिक /शारिरिक दृष्ट्या अपंग/कमजोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वाईट सवयी/संशयी, तापट स्वभाव असू शकतो. ईंटरनेट वरच्या चॅटिंग/डेटिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स (Marathi Matrimony) वरच्या अनेक फसवणुकीच्या प्रकरणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. काही वेळा लग्न झाल्यावर जोडीदार अपेक्षांमध्ये अगदीच बसत नाही हे लक्षात येऊन मानसिक त्रास होतो, त्याची परिणती घटस्फोटातही होते.

फसवणूक मुलींचीच होते असे नाही, तर मुलांचीही होते. आणि समाजाच्या सगळ्या स्थरांतील लोकांची होते. बराच खर्च करून झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेली व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होते. ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.

मायबोलीकर सुनील यांनी लिहिलेली गोष्ट ‘विश्वास – अविश्वास’, तसेच ‘कुणाशी तरी बोलायचंय’ मध्ये वेळोवेळी येणार्‍या अनुभवांवरुन हा धागा सुरु केला आहे. इथे मायबोलीकरांना माहिती असणारे लग्नातील फसवणुकीचे प्रकार व त्यावर घेता येणारी/घेता आली असती अशी सावधगिरी ह्यावर लिहिणे अपेक्षित आहे, जेणेकरुन या माहितीचा ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांना फायदा होईल.

Title: Marathi Matrimony things to consider before saying yes to an arranged.