मुंबई, २७ जून | लग्न म्हटले की (Marathi Matrimony), खूप जणांकडे पत्रिका पाहणे हे आलेच. पत्रिका जुळवून पाहताना काही गोष्टी या कटाक्षाने पाहिल्या जातात. ते म्हणजे पत्रिकेत मंगळ तर नाही ना? पत्रिकेत मंगळ असणे हे काही वेळा डोक्याला ताप होऊन जाते. तुम्हीही आजुबाजूला होणाऱ्या चर्चांमधून मंगळ दोष, त्याचे तोटे आणि निवारणासाठीचे उपाय अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील. पण त्यामध्येही कडक मंगळ, सौम्य मंगळ असेही प्रकार असतात. राशीत मंगळ असणे म्हणजे नेमके काय? त्याचे फायदे तोटे आणि लग्न जमवताना मंगळाला- मंगळ राशीचा मुलगा का पाहतात या सगळ्या गोष्टी अगदी मुद्द्यानिशी पाहून घेऊया.

Marathi Matrimony in Indian Hindu marriage culture match making Mangal Dosh in is highly considered in Vivah Kundali report :

मंगळदोष म्हणजे काय? (Mangal Dosha in Marathi Shaadi)
ज्योतिषानुसार पत्रिकेत एकूण 9 ग्रह सांगितले जातात. हे ग्रह पत्रिकेत वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या 1,4,7,8,12 या स्थानावर जर मंगळ असेल तर अशा व्यक्ती या मंगळदोषाच्या असतात असे म्हटले जाते. पत्रिकेत सगळेच ग्रह वेगवेगळ्या स्थानी असतात. पण या स्थानी मंगळ आला की, हा मंगळदोष (Marathi Matrimony) मानला जातो. मंगळ असलेल्या व्यक्तीला काही समस्यांना नक्कीच सामोरे जावे लागते. मंगळाच्या प्रभावाखाली पत्रिका किती आहे या नुसार कडक मंगळ, सौम्य मंगळ असे ठरवले जाते. मंगळदोषाखाली असलेल्या व्यक्ती या अधिक वेगळ्या स्वभावाच्या असतात.

Marathi-Matrimony-Mangal-Dosh

मंगळ ग्रहाला दोषी का मानतात
वर सांगितल्याप्रमाणे मंगळदोष असणाऱ्या किंवा मंगळ असणाऱ्यांच्या पत्रिकेत मंगळाचे वर्चस्व अधिक असते. मंगळ ग्रहाच्या व्यक्ती या सुख प्राप्त करण्यात एकदम पटाईत असतात. मंगळ ग्रह असलेल्या व्यक्ती या आपल्या गोष्टी मिळवण्यात जी काही मेहनत करतात ती इतरांना जमत नाही. त्यामुळे मंगळ असलेल्या लोकांशी मंगळ असलेली लोकच नीट वागू शकतात. एखाद्या व्यक्तीला मंगळ असेल आणि त्याच्या जोडीदाराला मंगळ नसेल तर अशा लोकांसोबत त्यांचे कधीच पटत नाही. इतर कोणत्याही ग्रहाबाबत असे काहीच होत नाही. पण मंगळ ग्रहाबाबत असे नक्कीच होते. मंगळ ग्रह हा खूप जणांच्या वैवाहिक जीवनानतला अडथळा बनतो. त्याच्यामुळे होणारे फायदे हे जरी कितीही चांगले असले तरी देखील त्यामुळे नुकसान अधिक होते. त्यामुळेच त्याला दोषी मानतात.

Marathi Shaadi marriage match making Mangal Dosh in Vivah Kundali report :

मंगळ असलेल्या व्यक्तीचा स्वभाव: (Marathi Shaadi)
* जर तुमच्या परिचयांपैकी कोणी मांगलिक असेल तर तुम्हाला त्यांचा स्वभाव थोडा वेगळा नक्कीच दिसेल. साधारणपणे मंगळ असलेल्या व्यक्ती खालीलप्रमाणे वागतात.
* अधीरता हा मंगळ ग्रहाचा गुणधर्म. या ग्रहाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे अशांचा स्वभाव हा फारच हट्टी असतो.
* एखाद्यावर वर्चस्व गाजवणे या अशा लोकांना खूप आवडते. ते इतरांचे काहीही ऐकून घेत नाहीत.
* मांगलिक असलेल्या व्यक्तींना राग पटकन येतो. अशांना खूप राग येतो आणि रागाच्या भरात अशा व्यक्ती काहीही करु शकतात.
* मांगलिक व्यक्तींच्या लैंगिक अपेक्षा या इतरांपेक्षा फार वेगळ्या असतात. लैंगिक इच्छा प्रबळ असते. त्यांच्या या गरजा केवळ मंगळ असलेल्या व्यक्ती समजू शकतात. इतर व्यक्ती त्यांच्या या गरजा समजू शकत नाही ज्यामुळे दुरावा येऊ शकतो.
* मंगळ असलेल्या व्यक्ती या अधिक प्रॅक्टिकल असतात. त्यांना कामामध्ये कोणतीही दिरंगाई चालत नाही.
* हळुवारपणा, गुळमुळीतपणा, शांत स्वभाव अशे काहीही गूण तुम्हाला मंगळ असलेल्या लोकांमध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे या व्यक्ती नक्कीच उठून दिसतात.

मंगळाचे मंगळ असलेल्या व्यक्तीशी लग्न:
आता पर्यंत तुम्ही खूप वेळा ऐकले असेल की, पत्रिकेत मंगळ असलेल्या लोकांचा विवाह हा मंगळ असलेल्याच लोकांशी केला जातो. त्यालाही काही कारणे आहेत. वरील काही स्वभाव वैशिष्ट्ये पाहता मंगळ असलेली लोकं इतर कोणालाही जुमानत नाही. त्यांच्याकडे हळुवारपणा ह गुणच नसल्यामुळे इतरांशी त्यांचे पटेलच असे काही सांगता येत नाही.अशा लोकांचा इतर लोकांशी विवाह केला तर घटस्फोटाची देखील वेळ येऊ शकते . त्यामुळे पत्रिकेत मंगळ किती कडक त्यानुसार या व्यक्तिंचा जोडीदार ठरवला जातो.

आता तुम्हाला मंगळ असेल किंवा परिचयातील कोणाला मंगळदोष असेल तर या काही गोष्टी नक्की लक्षात घ्या

Title: Marathi Matrimony marriage match making Mangal Dosh in Vivah Kundali report.