मुंबई, २७ जून | ज्योतिषानुसार पत्रिकेत एकूण 9 ग्रह सांगितले जातात. हे ग्रह पत्रिकेत वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या 1,4,7,8,12 या स्थानावर जर मंगळ असेल तर अशा व्यक्ती या मंगळदोषाच्या असतात असे म्हटले जाते. पत्रिकेत सगळेच ग्रह (Marathi Matrimony) वेगवेगळ्या स्थानी असतात. पण या स्थानी मंगळ आला की, हा मंगळदोष मानला जातो. मंगळ असलेल्या व्यक्तीला काही समस्यांना नक्कीच सामोरे जावे लागते. मंगळाच्या प्रभावाखाली पत्रिका किती आहे या नुसार कडक मंगळ, सौम्य मंगळ असे ठरवले जाते. मंगळदोषाखाली असलेल्या व्यक्ती या अधिक वेगळ्या स्वभावाच्या असतात.

Marathi Matrimony Mangal Graha bad effects on marriage problems is common problem of Indian grooms and Indian brides even everything is fine in life :

मंगळाचा त्रास हा शनीच्या साडेसाती पेक्षा काही कमी नसतो. या दोन्ही त्रासांमध्ये फक्त अंतर एकाच गोष्टीचं आहे, ते म्हणजे शनीच्या साडेसातीचा (Marathi Matrimony) प्रभाव फक्त त्याच व्यक्तीवर होतो ज्याला साडेसाती आहे. मात्र ‘मंगळ’ स्वत:च खूप तापट असल्यामुळे मंगळाचा त्रास असलेला व्यक्ती रागीट होतो आणि त्यामुळे त्याचे नातेसंबंध, मित्र, सहकारी दूर होऊ शकतात. एवढंच नव्हे तर ती व्यक्ती स्वत:च स्वत:ची शत्रू बनते.

मंगळ आपल्या वाईट प्रभावामुळे प्रभावित व्यक्तीचे अनेक शत्रू निर्माण करतो, त्याला वाईट व्यसनांकडे वळवतो, स्वभाव खूप हट्टी बनवतो, तसंच मंगळामुळे आपल्याच लोकांपासून व्यक्ती दूर जावू लागते. जर आपल्या आसपास कुणी मंगळाच्या प्रभावानं ग्रासलेली व्यक्ती असेल तर त्यासाठी हे काही खास उपाय आहेत. ज्यामुळे मंगळाचा त्रास कमी होईल.

Marathi-Matrimony-Mangal-Graha

Marathi Shaadi Mangal Graha bad effects on marriage problems :

मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी मंगळवारी करा खालील उपाय: (Marathi Shaadi)

* ज्या व्यक्तीचा मंगळ अधिक प्रभावी आहे, अशा व्यक्तीनं नारळाचं पाणी पिणं खूप चांगलं असतं. यामुळे मंगळ शांत होतो आणि त्या व्यक्तीमधील राग कमी होतो.
* मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारूतीरायावर तेल अर्पण करावं आणि शेंदूर लावावा. हनुमतांचं शेंदूराचा आपल्या कपाळावर टिळा लावावा.
* बुंदीचे लाडू आपल्या हातानं तयार करावे आणि त्यात चार लवंगा टाकून हनुमानाच्या चरणी मंगळवारी अर्पण करावेत.
* विड्याच्या पानावर काथ लावावा आणि असा विडा मंगळवारी बजरंगबलीला अर्पण करावा.
* दररोज हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्राचं पठण करावं.
* मोहरीच्या तेलात नीळ (पांढरे कपडे धुवायला वापरतो ती नीळ) मिसळून त्याचा दिवा मंगळवारी हनुमानासमोर लावावा.
* मंगळवारी उपवास करून गुळ आणि फुटाणे दान करावे.
* असं म्हणतात जो भक्त प्रत्येक मंगळवारी उपवास करतो आणि हनुमंताची विशेष पूजा करतो. त्याच्यावर मारूतीरायाची सदैव कृपा राहते.

ज्या तरूण-तरूणींना सौम्य मंगळ किंवा मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा विवाह ठरत नाही. अशा तरूणांनी हे उपाय करून बघण्यास काहीच हरकत नाही. मंगळाचा प्रभाव कमी झाला तर आपला राग शांत होईल आणि त्यामुळे दूर गेलेले व्यक्तीही जवळ येतील आणि जवळचे दूर जाणार नाहीत.

Title: Marathi Matrimony Mangal Graha bad effects on marriage problems.